Coolie Public Review : आज १४ अॅागस्ट २०२५ स्वातंत्रदिनाच्या आदल्या बहुचर्चित सुपरस्टार रजनीकांत यांचा कुली हा सिनेमा रिलीज झाला आहे. देशभरात रजनीकांत यांच्या चाहत्यांनी जल्लोष केल्याचं चित्र साऊथमधील अनेक थिएटर्सबाहेर आणि आत पाहायला मिळत आहे. कुठे फटाके फोडले जात आहेत, तर कुठे ढोल वाजवले जात आहेत. अशा पद्धतीने कुलीचं स्वागत प्रेक्षकांनी केलं आहे. कुणाला विश्वास बसणार नाही, पण रिलीजच्या आदीच कुलीने अडवॅान्स बुकिंग कलेक्शनमध्ये तब्बल १०० कोटी कमावले आहेत. आता कुली पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून, प्रेक्षक सिनेमाच आणि खासकरून रजनीकांत यांचं कौतुक करत आहेत. खरंतर या सिनेमात रजनीकांतशिवाय अनेक कलाकार आहेत. बॅालिवूडचा अभिनेता आमिरचाही कॅमिओ सिनेमात दाखवण्यात आला आहे. पण नागार्जुन आमिरला पाहिलं छान वाटलं, पण रजनीसमोर सगळी फिके असल्याची प्रतिक्रिया एका प्रेक्षकाने दिली आहे. तर सिनेमात आमिरचा वापर हवा तितेका केला नाही, असं देखील एका प्रेक्षकाने सांगितलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन लोकेश कणगराज याने केलं असून, त्याचही कौतुक केलं जात आहे. या सिनेमाचा रिव्ह्यू करणाऱ्यांनी देखील सिनेमाच्या अनेक पैलूंवर भाष्य केलं आहे. सिनेमाची कथा पकडून ठेवणारी असल्यांच सांगितलं आहे. कथेत अनेक ट्वीस्ट अॅण्ड टर्न असल्यानं सिनेमाची कथा प्रेक्षकांना बांधून ठेवते. हेही वाचा : Pratik Gandhi On Phule Movie Failure: “खूप अपेक्षा होत्या पण…”, ‘फुले’च्या अपयशावर प्रतीक गांधीची खंत; म्हणाला, “सिनेमा लोकांपर्यंत पोहोचलाच नाही”