Stuti Sonawane case : मुंबईत राहणाऱ्या डॅा. स्तुती बजरंग सोनावणे या तरुणीने ८ मार्च महिलादिना दिवशी आपल्या आयुष्याचा शेवट केला. प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून स्तुतीने आपल्या राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी पोलिसांनी फजल मोहम्मद खान (वय ३१) याला अटक केली आहे. मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फजल याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्तुतीने सुसाईड नोट लिहिली होती. ती पोलिसांच्या हाती लागली आहे. सहा पानांच्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सहा पानांच्या सुसाईड नोटमध्ये स्तुतीने फजलशी ओळख कशी झाली? तो तिच्यासोबत कसा वागायचा? हे सांगितले आहे. आपली पहिली भेट दादरला झाली होती ते मला अजूनही आठवतंय. आपण तासन्तास चाललो होतो आणि पिझ्झा खाताना तू मोठ्याने ओरडत हसत होतास. त्याक्षणी आपली लगेचच छान मैत्री झाली होती. माझा वाढदिवस तू ताज हॉटेलमध्ये ज्या प्रकारे साजरा केला, खोली सजवली होतीस, ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कोणी मला इतकं खास वागवेल असं मी कधी कल्पनाही केली नव्हती, असे तिने म्हटले आहे. हेही वाचा : Rahata News : केंद्र सरकार हाय हाय! राहाता शहरात मविआचा महागाईविरोधात एल्गार; पाहा काय घडलं? पुढे ते म्हणते, आपली अलीबागचा ट्रिप, त्या बाइक राईड्स, आंबट कँडी खात घालवलेले क्षण, त्या छोट्या बाथटबमध्ये तू बसण्याचा प्रयत्न करत होतास ते खूप मजेशीर आणि गोड होतं. बॅडमिंटन खेळताना मी तुला नेहमी हरवायचे, तेही मला आठवतं. ड्रॅगनफ्लाय हायच्या गल्ल्यांमध्ये आपण फिरायचो, छोट्या कामांसाठी जायचो आणि मांजरींना कुरवाळायचो, ते क्षणही आठवतात. आपण खेळलेला तो गेमही आठवतो, ज्यात आपण दोघांनी एकाच ‘पॉइझन कँडी’ची निवड केली होती. किती योगायोग होता तो… त्यानंतर पुढे तिने फजलकडून होणाऱ्या त्रासबद्दल सांगितले आहे, ते म्हणते, तू मला खूप अपमानित केलंस. मी इतकी वाईट आहे का? तुझे शब्द इतके तीव्र होते की ते माझं आयुष्य संपवण्यासाठी पुरेसे ठरले. मी पूर्णपणे सुन्न झाले आहे. मला काहीच समजत नाही. मला आशा आहे की तू आनंदी असशील आणि तुझा नाजूक पुरुष अहंकार आता समाधानी झाला असेल. मी आयुष्यात कधी इतकी खालच्या पातळीवर वाटले नव्हते. यापेक्षा वाईट काय होऊ शकतं?सगळं असूनही मला स्वतःवर हसू येतंय, कारण मला अजूनही तुझ्यासोबत राहायचं होतं. तुझे शब्द माझ्या डोक्यात सतत घुमत आहेत. तू माझ्यावर ओरडलास. मला असं वाटलं की मी तुझ्यासमोर असते तर तू मला मारलंच असतंस किंवा खूप हिंसक झाला असतास. मला तुझी भीती वाटते. तू मला “हो” म्हणालास, तू म्हणालास की माझ्यावर खर्च केलेला वेळ आणि पैसे तुला वाया गेल्यासारखे वाटतात. खरं सांगायचं तर मला तुझ्यासोबत कधीच सुरक्षित वाटलं नाही, पण तरीही मी तुझ्यावर प्रेम केलं. असे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. नेमकं काय घडलं? डॅा. स्तुती सोनावणे हिची फजल खानशी ओळख एका डेडिंग अॅपवरुन झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि त्यानंतर प्रेम झाले. दोघेही एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये भांडणे व्हायची. त्यावेळी फजल खान तिला मारुन टाकण्याची धमकी द्यायचा, असा आरोप स्तुती सोनावणे हिने केला आहे. दरवाजा तोडला अन्… ८ मार्च रोजी स्तुतीचे आई-वडील जेवण्यासाठी बाहेर गेले होते. हे दोघे घरी परत आल्यावर स्तुती तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती. त्यावेळी स्तुतीच्या वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला असता स्तुतीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे आणखी कोणती नवीन माहिती या प्रकरणात समोर येते हे पाहावे लागेल. स्तुतीचे वडिल काय म्हणाले? स्तुतीही मानसिक तणावात होती हे तिने कधी दाखवले नाही. ती हुशार होती अभ्यासू होती. त्या रात्री ती अभ्यासासाठी तिच्या खोलीत होती त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र ती ज्या गोष्टींमध्ये मानसिक तणावात होती त्याबाबत आम्हाला कधीच सांगितलं नाही. सांगितलं असतं तर आम्ही त्यातून मार्ग काढला असता, अशी प्रतिक्रिया स्तुतीच्या वडिलांनी दिली. हेही वाचा : Jamkhed News : कांद्याच्या शेतात अफुची शेती; खर्डा पोलिसांनी ६ लाखांची झाडे केली जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल