Rahul Gandhi : “खवळलेल्या समुद्रात पोहायला आवडते..”; राहुल गांधी यांची सूचक पोस्ट
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी सोशल मीडियावरून सूचक आशयाची पोस्ट प्रसिद्ध केली. मला खवळलेल्या समुद्रात पोहायला आवडते.

Rahul Gandhi – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी सोशल मीडियावरून सूचक आशयाची पोस्ट प्रसिद्ध केली. मला खवळलेल्या समुद्रात पोहायला आवडते. त्यामुळे तशी खवळलेली स्थिती हे शांततेचे वेगळे स्वरूप असल्याचे शिकायला मिळते, असे त्यांनी म्हटले.
राहुल यांनी नेमक्या कुठल्या अर्थाने, कारणाने संबंधित भावना व्यक्त केली याचा तातडीने उलगडा होऊ शकला नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या कामकाजाविषयी मोठे वादळ उठले आहे.
विरोधकांनी आणि विशेषत: कॉंग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. राहुल यांनीही आक्रमक पवित्रा स्वीकारत कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
त्यावरून भाजपनेही राहुल यांच्यासह कॉंग्रेसला घेरण्याचे सत्र आरंभले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. त्या घडामोडींचा संदर्भ घेऊन राहुल सोशल मीडियावरून व्यक्त झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.





