Sonam Wangchuk : सीजेपीच्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांचा पाठिंबा; थेट म्हणाले….
निवडणूक आयोगाने शनिवारी स्पष्ट केले की, एसआयआरशी संबंधित सर्व निर्णयांना तिन्ही आयुक्तांची एकमताने मंजुरी मिळाली होती.

Sonam Wangchuk – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने २ ऑक्टोबर रोजी नियोजित केलेल्या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रविवारी पाठिंबा दर्शविला.
देशात आणि निवडणूक प्रक्रियेत उत्तरदायित्व सुधारण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा मिळायला हवा, असे त्यांनी म्हटल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
तथापि, वांगचुक यांनी सांगितले की ते या आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत; त्यांनी यावर भर दिला की आंदोलने ही त्यांच्या सहभागाशिवायही स्वतःच्या बळावर टिकून राहणारी असावीत. निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून वाद सुरू असताना त्यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
गेल्या १० महिन्यांत निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार नोंदणी, नावे वगळणे व पुन्हा समाविष्ट करणे आणि मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरावृत्ती यांसारख्या निर्णयांवर किमान १४ वेळा अधिकृतपणे आक्षेप नोंदवले होते.
निवडणूक आयोगाने शनिवारी स्पष्ट केले की, एसआयआरशी संबंधित सर्व निर्णयांना तिन्ही आयुक्तांची एकमताने मंजुरी मिळाली होती.






