Devendra Fadnavis : “पुढील वर्षीही एल निनोचे सावट, येणाऱ्या अडचणींना तयार रहावे लागेल” – देवेंद्र फडणवीस
वातावरणात बदल होतील, त्यानंतर एल निनो इफेक्ट कमी होईल. पण आपल्याला सगळ्या प्रकारच्या तयारीत राहावे लागेल. ज्या अडचणी येतील त्यासाठी तयार रहावे लागेल, असे फडणवीस यांनी म्हटले.

Devendra Fadnavis – राज्यातील 75 टक्के भागात सरकारकडून दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी काळात शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहेत. अशातच पुढच्या वर्षीही एल निनोचा प्रभाव कायम राहू शकतो, असे अंदाज वर्तविले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले असून, पुढील वर्षी एल निनोचा प्रभाव कायम राहिला तर आपल्याला त्या परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल, असे संकेत त्यांनी दिले. ते नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
फडणवीस यांनी म्हटले की, मुळात आता जो एल निनो आहे हा अजून शिगेला पोहोचणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार फेब्रुवारीत तो पीकला जाईल. फेब्रुवारीनंतर तो खाली येईल, अशी परिस्थिती आहे. पॅसिफिक महासागरातील उष्णतेमुळे एल निनो तयार होतो.
हा कुल डाऊन होईल. वातावरणात बदल होतील, त्यानंतर एल निनो इफेक्ट कमी होईल. पण आपल्याला सगळ्या प्रकारच्या तयारीत राहावे लागेल. ज्या अडचणी येतील त्यासाठी तयार रहावे लागेल, असे फडणवीस यांनी म्हटले.





