Raj Thackeray : “सरकारचं माहित नाही, पण…”; तिरंगा मार्चअगोदर राज ठाकरेंचं मोठं विधान “वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न…”
Raj Thackeray : राज ठाकरे यांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या मनसैनिक आणि शिवसैनिकांना उद्देशून सोशल मीडियावर एक विशेष लिहिली आहे.

Raj Thackeray : मुंबईत उद्या केंद्रातील भाजपप्रणीत सरकारच्या निषेधार्थ होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना देत मुंबई पोलिसांबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. या मोर्चात मुंबई पोलीस आपल्या बाजूने असतील, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या मनसैनिक आणि शिवसैनिकांना उद्देशून सोशल मीडियावर एक विशेष लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच पक्षाचे झेंडे किंवा ‘राज-उद्धव’ यांच्या नावाने घोषणाबाजी न करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मुंबई पोलिसांचा उल्लेख करताना राज ठाकरे म्हणाले, “सरकारचं माहित नाही, पण महाराष्ट्रातील पोलीस आपल्या सोबत आहेत. कारण त्यांच्याही मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न तितकाच गंभीर आहे.” त्यामुळे पोलिसांकडून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोर्चात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच त्यांची सुरक्षिततेची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ( Raj Thackeray)
मोर्चाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष (Raj Thackeray)
याचबरोबर मोर्चात गोंधळ घालण्याचा किंवा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक इशाराही राज ठाकरे यांनी दिला. अशा व्यक्तींना शक्य असल्यास पोलिसांच्या ताब्यात द्यावे. मात्र, जिथे पोलीस नसतील तिथे अशा लोकांचा “पाहुणचार” कसा करायचा याचा अनुभव आणि ताकद आपल्या कार्यकर्त्यांकडे असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे उद्याच्या मोर्चाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना
सस्नेह जय महाराष्ट्र,येत्या २६ जुलैला NEET परीक्षेतील गोंधळ, त्याबद्दल विद्यार्थ्यांचं सुरु असलेलं आंदोलन आणि ते आंदोलन चिरडण्याचा सरकारचा सुरु असलेला प्रयत्न याविरोधात आपण ‘तिरंगा मार्च’ काढत आहोत. त्याबद्दल तुम्हाला आपल्या… pic.twitter.com/wzkSQBWSyc
— Raj Thackeray (@RajThackeray) July 25, 2026
तिरंगा मोर्चाचे आयोजन (Raj Thackeray)
उद्या २६ जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वतीने ‘तिरंगा मार्च’ काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सकाळी १० वाजता शिवाजीपार्क ते सिद्धीविनायक मंदिरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा ‘तिरंगा मार्च’ हा दिल्लीतलं सरकार आणि त्यांच्या आदेशानुसार दिल्लीतील पोलीस जी मुजोरी दाखवत आहेत याचा निषेध करण्यासाठी आहे, असेही पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.





