Abhijit Dipke : “मी सर्व समर्थकांची माफी मागतो”; अभिजीत दिपकेंनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी केलं आवाहन…
Abhijit Dipke : भर पावसात रात्रभर आंदोलक जंतरमंतरवर ठाण मांडून

Abhijit Dipke : राजधानी दिल्लीतील आंदोलन आता थेट संसदेच्या दारापर्यंत पोहोचलं आहे. जंतरमंतरवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ने सोमवारी, २० जुलै रोजी ‘चलो संसद’ची हाक दिली. त्यासाठी संसदेच्या दिशेने निघालेल्या आणि जंतरमंतरवरील आंदोलकांवर दिल्ली पोलीसांनी बेछूट लाठीमार केला होता.
या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले असून त्यापैकी एका तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची माहिती स्वत: ‘कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी दिली आहे. (Abhijit Dipke)
अभिजीत दिपके यांनी यासंदर्भात ट्वीट करत लिहिले की, “पोलिसांच्या लाठीमारात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर राममनोहर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केंद्र सरकार तरुणांशी इतक्या अमानुषपणे का वागत आहे?” असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला. (Abhijit Dipke)
तर आणखी एका पोस्टमध्ये दिपके यांनी आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थांची माफी मागितली आहे. “मी आमच्या सर्व समर्थकांची, आणि विशेषतः पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून निर्दयपणे मारहाण झालेल्या तरुणींची माफी मागतो. आम्ही अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो. दिल्ली पोलिसांच्या अमानवीय कृत्यांपासून तुमचे रक्षण करण्यासाठी मी अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकलो असतो. (Abhijit Dipke)
I apologise to all our supporters, especially the girls who were brutally beaten by male police officers.
We could have done better. I could have done better to protect you from the inhumane actions of the Delhi Police.
To protect one Dharmendra Pradhan, who is responsible for…
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 21, 2026
२० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी, सरकार आणखी अनेक तरुण विद्यार्थ्यांचे रक्त सांडायलाही तयार होते. जर तुम्ही जखमी झाला असाल आणि हा संदेश पाहत असाल, तर कृपया मला थेट संदेश (DM) पाठवा. मला तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलायचे आहे आणि तुमची माफी मागायची आहे. आम्ही तुम्हा सर्वांसाठी लढा देत राहू,” असे आवाहन अभिजीत दिपके यांनी केले आहे.
दरम्यान, काल दुपारी पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरवरुन हटवले होते. भर पावसात रात्रभर आंदोलक त्याच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. मात्र, आज सकाळपासून आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर जमू लागले आहेत. त्यांनी स्टेज पुन्हा उभारला असून पुन्हा आंदोलन सुरु केले आहे.
चर्चा ठरली निष्फळ (Abhijit Dipke)
सीजेपीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं होतं. पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी यावेळी सरकारकडे 3 प्रमुख मागण्यांचं निवेदन दिलं.
सोनम वांगचुक यांना त्वरीत सोडावं, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि NEET मध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी, या तीन मागण्या सीजेपीकडून करण्यात आल्यात. मात्र, या चर्चेनंतरही तोडगा निघालेला नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असे कॉककोच जनता पार्टीकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा:





