CJP Parliament March: दिल्ली पोलिसांची मर्यादित मोर्चाला परवानगी ; अभिजीत दिपके यांची मोदी सरकारवर टीका
CJP Parliament March: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 31 वा दिवस आहे.

CJP Parliament March: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 31 वा दिवस आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारली होती.
दरम्यान, सोमवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी भूमिका काहीशी शिथिल करत मर्यादित स्वरूपात मोर्चा काढण्यास परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार आंदोलकांना जंतरमंतरपासून केरळ भवनापर्यंत, सुमारे एक किलोमीटर अंतराचा मोर्चा काढण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, ही अट आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके स्वीकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#WATCH | Delhi: Founding President of the Cockroach Janta Party, Abhijeet Dipke, says, “The biggest march in India’s history is about to take place. For the past 10-12 years, attempts have been made to destroy democracy in this country. By sitting at Jantar Mantar for a month,… pic.twitter.com/9qjO1ACNtY
— ANI (@ANI) July 20, 2026
शनिवारी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दिपके यांनी स्वीकारले आहे. सोमवारी सकाळी आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला. CJP Parliament March:
दिपके म्हणाले, “आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघणार आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून देशातील लोकशाही कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जंतरमंतरवर महिनाभर ठामपणे आंदोलन करून तुम्ही लोकशाही पुन्हा जिवंत केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दिल्लीत पोहोचत आहेत. जे अशक्य मानले जात होते, ते आपण शक्य करून दाखवले.”
ते पुढे म्हणाले, “कालपर्यंत मोर्चाला परवानगी नाकारणारे पोलीस आज आम्हालाच कोणत्या मार्गाने जाणार, अशी विचारणा करत आहेत. हा आपल्या आंदोलनाचा पहिला मोठा विजय आहे.”
यावेळी अभिजीत दिपके यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. “मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी” अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यानंतर आंदोलकांनीही “जय भीम, जय संविधान” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. CJP Parliament March:





