Raksha Khadse | एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडीमधून अटक करण्यात आली आहे. ते सध्या जेलमधून त्यांच्याबाबत सातत्याने नवेनवे खुलासे होते आहेत. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खेवलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. खेवलकर यांच्या मोबाइलमध्ये १,७७९ आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोंसह मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप चाकणकर यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (SIT) करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. भाजपने एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध केलेल्या आंदोलनावरून तसेच खडसे कुटुंबावर होत असलेल्या आरोपावरून भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेवटी राजकारण आहे…. रक्षा खडसे म्हणाल्या की, “सध्या आज जे काही सुरू आहे, त्याच्या वेदना मला सुद्धा होत आहेत, शेवटी राजकारण आहे, कशा पद्धतीने जातं आहे, हे तुम्ही सुद्धा बघता आहात, जळगाव जिल्ह्यामध्ये हे कुठेतरी थांबले पाहिजे. जळगाव जिल्ह्यामध्ये या गोष्टी सुरू आहेत, त्या कशा पद्धतीने सुरू आहेत, या सर्वांना माहिती आहे.” Raksha Khadse | पुढे त्या म्हणाल्या, “कुणीही नेता असो त्यांनी विकासावर भर दिला पाहिजे, अशी या जिल्ह्याची आणि मतदार संघाची लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे. शेतकऱ्यांचे असतील किंवा विकासाचे असतील अनेक मुद्दे आहेत, त्याकडे कुणीही नेता असो त्याने लक्ष दिले तर जिल्ह्याचे चांगले होईल,” असं म्हणत रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Raksha Khadse | हेही वाचा : रशिया-युक्रेनमधील युद्ध संपणार? ; डोनाल्ड ट्रम्प-पुतिन यांच्यात लवकरच भेट, कुठे होणार भेट? वाचा