Stock Market: कंपन्यांच्या बाजार मूल्यात मोठी वाढ!
Updated On:

मुंबई – गेल्या दोन दिवसापासून भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी वाढत आहेत. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन दिवसांमध्ये 1,382 अंकांनी म्हणजे 1.70 टक्क्यांनी वाढला आहे. कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य या दोन दिवसात 9.08 लाख कोटी रुपयांनी वाढून 1,240 लाख कोटी रुपये म्हणजे 5.14 लाख कोटी डॉलरवर गेले आहे.
गुरुवारी 2,639 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर केवळ 1,325 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारानी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे सर्व क्षेत्राचे निर्देशांक गुरुवारी वाढले. मात्र आता शेअर बाजाराचे निर्देशांक बर्याच उच्च पातळीवर आहेत. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची जास्त शक्यता असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.





