HSC Exam: पेपर फुटीच्या प्रकरणात चौघांविरोधात गुन्हा
Updated On:

मुंबई – इयत्ता बारावीच्या परिक्षेतील गणिताचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी रविवारी सांगितले. शुक्रवारी दादर परिसरातील डॉ. अँटोनियो डिसिल्व्हा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात ही घटना घडली, तेथे एका परीक्षा नियंत्रकाला त्याच्या मोबाईल फोनवर गणिताची प्रश्नपत्रिका असलेला विद्यार्थी सापडला होता.
विद्यार्थ्याने परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी त्याच्या मोबाइल फोनवर सर्व उत्तरे मिळविण्यासाठी प्रश्नपत्रिका दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवली होती. या विद्यार्थ्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी तीन विद्यार्थी आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाची अन्य चौकशी सुरू आहे.





