Pune : हिंदीच्या पेपरला १६ कॉपी बहाद्दर
Updated On:

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीच्या परीक्षेत हिंदीच्या पेपरला राज्यात १६ कॉपी बहाद्दर सापडले आहेत. यात छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉपीची सर्वाधिक १३ प्रकरणे आढळली आहेत.
इयत्ता बारावीच्या परीक्षेत मंगळवारी पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला राज्यात एकुण ४२ कॉपी बहाद्दर सापडले होते. त्यानंतर बुधवारी झालेल्या हिंदी विषयाच्या पेपरलाही कॉपीच्या गैरमार्गाचा अवलंब करताना विद्यार्थी सापडले आहेत.
पुणे विभागात एक, लातूर विभागात दोन कॉपीची प्रकरणे आढळली आहेत. नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, कोकण या विभागात हिंदी विषयाच्या पेपरमध्ये गैरमार्गाचे एकही प्रकरण आढळले नाही.





