Pune : गणिताच्या पेपरला ६६ कॉपी बहाद्दर
Updated On:

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गणित आणि संख्याशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये राज्यात ६६ कॉपी बहाद्दर सापडले आहेत.
कॉपीमुक्त जनजागृती अभियान राबविण्यात आलेले असताना राज्यातील विविध विभागांमध्ये प्रत्येक पेपरला कॉपीची प्रकरणे आढळून आलेली आहेत. शनिवारी गणित आणि संख्याशास्त्राचा पेपर घेण्यात आला.
यातही सर्वाधिक ३९ कॉपीची प्रकरणे छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळून आलेली आहेत. पुणे – ४, नागपूर – ६, कोल्हापुर – १, अमरावती – ३, लातूर – १३ याप्रमाणे विभागनिहाय कॉपीची प्रकरणे आढळून आलेली आहे. मुंबई, नाशिक, कोकण या विभागात कॉपीचे एकही प्रकरण आढळून आलेले नाही.





