पुण्यात ‘हापूस’ आंबा किती रुपये डझन मिळतोय? पाहा दर

पुणे – उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूजला असलेली मागणी कायम आहे. मात्र, त्या तुलनेत आवक असल्याने भाव स्थिर आहेत. हवामनातील बदलामुळे हापूसची आवक घटली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयानंतरही हापूस आंब्याच्या पेटीच्या भावात 500 रुपयांनी वाढ झाली आहे.
बाजारात येत असलेल्या लिंबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने तसेच ती कच्ची असल्याने ती खरेदी करण्याकडे खरेदीदारांनी लिंबाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, घाऊक बाजारात लिंबाच्या 15 किलोंच्या गोणीमागे दिडशे ते दोनशे रुपयांनी घसरण झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने चिक्कूच्या भावात दहा टक्क्यांनी तसेच पपईच्या भावात किलोमागे तीन ते पाच रुपयांनी घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
येथील बाजारात रविवारी (दि. 23) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, संत्री 5 ते 6 टन, मोसंबी 25 ते 30 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबांची सुमारे 1 हजार 700 ते 2 हजार 200 गोणी, कलिंगड 30 ते 40 टेम्पो, खरबूज 20 ते 25 टेम्पो, पेरू 600 ते 700 क्रेट्स, चिक्कू दिड ते दोन हजार डाग, हापूस आंबा दोन हजार पेटी इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 700-1500, मोसंबी : (3 डझन) : 280-400, (4 डझन) : 100-220, संत्रा : (10किलो) : 400-1200, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-200, गणेश : 10-40, आरक्ता 20-60, कलिंगड : 5-12, खरबूज : 10-25, पपई : 5-15, अननस (एक डझन) : 100-500, पेरू (वीस किलो) : 300-400, चिक्कू (दहा किलो) : 100-400. हापूस 4 ते 8 डझन पेटी (2500-6500)





