Viral video : पुणे रेल्वे स्थानकातील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल; पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान!
Viral video : पुणे रेल्वे स्थानकावरील एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाला ही गोष्ट जीवघेणी ठरली असती. मात्र, संबंधित प्लॅटफॅार्मवर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रवाशी रेल्वे आणि प्लॅटफॅार्मच्या मध्ये पडता पडता वाचले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील एका प्लॅटफॅार्मवर ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे.
Video: पुणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर जीवघेणा क्षण! पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवासी, व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल #pune #viralvideo pic.twitter.com/FVOghgtfMy
— sandip kapde (@SandipKapde) August 3, 2025
नेमकं काय घडलं?
चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्म व ट्रेनच्या मधील पाताळात अडकण्याच्या मार्गावर होता. इतक्यात तिथे असणारे पोलिस कर्मचारी पांडुरंग चव्हाण यांनी धाव घेत प्रवाशाला हात दिला आणि बाहेर ओढले. त्यांच्या सतर्कतेमुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला आणि प्रवाशाला जीवदान मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पांडुरंग चव्हाण यांच्या सतर्कतेची आणि साहसाचे कौतुक केले जात आहे.





