पुण्यातील सन्मित्र सहकारी बॅंकेकडून सभासदांच्या पाल्यांचा गौरव

हडपसर, दि. 2 (प्रतिनिधी)-सन्मित्र सहकारी बॅंक नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करीत आहे. हे सहकार क्षेत्रात नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
हडपसर येथील सन्मित्र सहकारी बॅंकेच्या वतीने आयोजित गुण गौरव समारंभात ते बोलत होते. वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुण गौरव समारंभ झाला. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी विधानपरिषद सदस्य जगन्नाथ शेवाळे, सन्मित्र बॅंकेचे अध्यक्ष सुनील गायकवाड, उपाध्यक्ष भरतलाल धर्मावत, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास आदमाने तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. संचालक गणेश फुलारे यांनी सूत्रसंचालन केले, तर धर्मावत यांनी आभार मानले.





