पुणे जिल्हा | एकरी १०० टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

राहू, (वार्ताहर)- श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा १४ वा वार्षिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त कारखान्याशी निगडीत सर्व शेतकरी, कर्मचारी, परिसरातील सामान्य जनाच्या मंगलमय आयुष्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शेतकरी बांधव,
कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी बांधव असे ५१ जोड्प्यांच्या हस्ते ‘संकल्प महायज्ञ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त औक्षण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीसदगुरू शांतीनाथजी महाराज संकल्प महायज्ञ कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्वांना शुभाशीर्वाद दिले. कार्याध्यक्ष विकास रासकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख अतिथी, राष्ट्रीय किर्तनकार, ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्षेत्रातील ह.भ.प. महाराज व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले की, पुढील वर्षीच्या ऊस गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याची क्षमता ७५०० टन प्रति दिन इतकी करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटणार आहे. येणाऱ्या हंगामात दैनंदिन ५ हजार टन चालविण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारणी केली आहे.
शेतकी विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली “थोडेसे बदला, एकरी १०० टन ऊस उत्पादन मिळवा’ योजनेत सहभाग घेऊन आडसाली उसामध्ये एकरी १०० टनाहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या २३ आणि खोडवा पिकामध्ये एकरी ७५ हून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या ३ शेतकऱ्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला आहे.
कारखान्याचे संचालक, शेतकरी आणि कर्मचारी अशा ५० जोडप्यांच्या हस्ते संकल्प महायज्ञ करण्यात आला आहे. राष्ट्रीय किर्तनकार ह. भ.प. चारुदत्त आफळे महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजी गवारे, कारखान्याचे सह कार्यकारी संचालक माधव राऊत, संचालक महेश करपे,
अनिल भुजबळ, किसन शिंदे, ज्ञानदेव कदम, सतीश केंद्रे, लता केंद्रे, अंकुशराव ढमढेरे, रवींद्र भुजबळ, भगवानराव मेमाणे, हनुमंत शिवले, लक्ष्मण कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, शेतकरी उपस्थित होते, कारखान्याचे उपाध्यक्ष योगेश ससाणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे निवेदन गणेश टेमगिरे यांनी केले.
नाना केरू वडघुले ‘ऊस श्री’
आडसाली ऊसामध्ये कारखान्याच्या व डीएसटीए पुणे संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित ऊस विकास योजनांचा प्रभावीपणे वापर करून नाना केरू वडघुले (टाकळी भिमा) यांनी एकरी ११४.२३४ टन ऊस उत्पादन मिळविले. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मानाचा “ऊस श्री” पुरस्कार आणि महिला शेतकरी अलका शहाजी चोंधे यांनी खोडवा ऊस पिकामध्ये एकरी ७८.२२० टन उत्पादन मिळविले. त्याबद्दल त्यांना “ऊस लक्ष्मी” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शंभर टनाचे मानकरी
एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्यामध्ये संतोष कुलाळ (वडगांव बांडे), राजेंद्र मेमाणे (वडगांव बांडे), श्वेताली सूर्यकांत कड (केडगांव), ज्ञानेश्वर मगर (दहिटणे), किसन शिंदे (राहू), तानाजी मेमाणे (वडगांव बांडे), दशरथ टेळे (टेळेवाडी), राजेंद्र कदम (खुटबाव), सोमनाथ शिंदे (राहू), अनिल जांभुळकर (लडकतवाडी), आबासो टेळे (टेळेवाडी), अजय शितोळे (रांजणगांव सांडस), प्रवीण जगताप (राहू),
सुनील कुंभार (रांजणगांव सांडस), राहुल अवचट (यवत स्टेशन), तानाजी हंबीर (पाटेठाण), दीपक ताम्हाणे (भरतगांव), नागेश कोंडे (वढू खुर्द), रमणलाल लुंकड (वडगाव रासाई), अशोक डुकरे (वढू खुर्द), खोडवा ऊस पिकामध्ये ७५ टनांहून अधिक ऊस गणेश वायकर (पिंपरी सांडस), सुनीता निळकंठ थोरात (नाथाचीवाडी) अशा प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना डीएसटीएचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, डॉ. चव्हाण व सहकारी शास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले आहे.





