पुणे जिल्हा | आता वेळ पण मोबाइलमध्ये दिसते – खासदार सुप्रिया सुळे

राहू, (वार्ताहर)- आता मोबाईलवर वेळ कळते. त्यामुळे कोणी काळजी करायची नाही. आता आपल्या पक्षात लोकशाही चालते. कोणाचा दबाव चालत नाही,
अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे नाव न घेता केली. दौंडमध्ये लोकनेते आप्पासाहेब पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व कृतज्ञता मेळाव्यात त्या बोलत होत्या.
दौंड येथील पवार पॅलेस येथे (दि.१) राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा व कृतज्ञता सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी छोटे खाणी भाषणात लोकसभेला दिलेल्या मतदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्या म्हणाल्या की, मला पहिल्यापासूनच तुमची साथ लाभली आहे. परंतु कालची निवडणूक ही वेगळी होती. परंतु तुम्ही ती हातात घेतली. पार पाडली. त्यामुळे मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथे आले आहे. यावेळी दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सर्व पदाधिकारी तसेच सर्व एकचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तुमच्या मनातील उमेदवार
सुप्रिया सुळे यांचे भाषण चालू असताना समोरील कार्यकर्त्यामधून उमेदवार जाहीर करण्याची मागणी होऊ लागली. यावर त्या म्हणाल्या की, मला तो अधिकार नाही. आम्हीही उमेदवार लवकर जाहीर करण्याची मागणी करीत आहोत.
परंतु लवकरच तुमच्या मनातील उमेदवार दिला जाईल याची खात्री मी तुम्हाला देते. दोन दिवसांत म्हणजेच घटस्थापनेच्या आसपास उमेदवार जाहीर करण्याची सर्व बाजूंनी मागणी होत आहे.
सार्वजनिक नका सांगू. परंतु त्या उमेदवाराच्या कानात सांगा, की जेणेकरून त्यांना लोकांपर्यंत पोहचायला अजून जास्त वेळ मिळेल.
गर्दीचा उच्चांक
कार्यक्रम जरा म्हणजे सायंकाळी साडेसहा वाजता होता. उशिरा असून सुद्धा पवार पॅलेसला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली. दौंडच्या पश्चिम टोकाकडून देखील इतक्या उशिरा देखील लोकांनी हजेरी लावली.





