जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, Honda ची नवी कार बाजारात येणार आहे. विशेष म्हणजे Honda ची ही कार Maruti Suzuki Dzire टक्कर देणार आहे. तर ही कार कधी लॉन्च होणार? या कारची किंमत किती असणार? याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया… ‘या’ दिवशी लॉन्च होणार Honda Amaze? Honda Amaze चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल 4 डिसेंबरला लॉन्च होणार आहे. 4 डिसेंबरला जपानी कार कंपनी या आलिशान सेडानची किंमत जाहीर करणार आहे. मात्र ही कार लॉन्च होण्यापूर्वीच तिचे बुकिंग सुरु झाले आहे. तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हीदेखील बुक करू शकता. ‘या’ ठिकाणी करू शकता बुकिंग Honda Amaze ची बुकिंग सुरू केलेली नाही.निवडक होंडा डीलरशिप्स अधिकृतरित्या Honda Amaze च्या नवीन एडिशनचे बुकिंग करत आहेत. तुम्हीही ही नवी सेडान खरेदी करणार असाल तर जवळच्या डीलरशिपवर जाऊन बुकिंग करू शकता. होंडाने यापूर्वीच नवीन Honda Amaze चा टीझर रिलीज केला आहे. ‘या’ कारमध्ये कोणते फिचर आहेत? होंडाची नवी Amaze सिल्व्हर, रेड, गोल्डन ब्राऊन, व्हाईट, ग्रे आणि ऑब्सिडियन ब्लू या सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात एलईडी प्रोजेक्टर, एलईडी डीआरएल, नवीन अलॉय व्हील्स सारखे फीचर्स नव्या डिझाइनअंतर्गत मिळू शकतात. एडीएएस, वायरलेस चार्जर, रियर एसी व्हेंट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट यांसारखे फीचर्सही दिले जाऊ शकतात. नवी Honda Amaze सध्याच्या 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड थ्री सिलिंडर पेट्रोल इंजिनसह लॉन्च करण्यात येणार आहे. पॉवर ट्रान्समिशनसाठी यात 5 स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय असेल. ‘या’ गाडयांना देणार टक्कर नवी Honda Amaze भारतात लॉन्च झाल्यानंतर त्याची थेट टक्कर ह्युंदाई ऑरा, टाटा टिगोर आणि मारुती सुझुकी डिझायरशी होणार आहे. नवी होंडा अमेझ व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स अशा तीन ट्रिममध्ये सादर केली जाण्याची शक्यता आहे.