Instagram End-to-End Encryption : इंस्टाग्रामवरील चॅटिंग सुरक्षित राहणार नाही; महत्त्वाचे फीचर होणार बंद
Instagram End-to-End Encryption : इंस्टाग्रामने एंट-टू-एंड एन्क्रिप्शन मेसेज फीचर बंद केल्यानंतर तुमच्या इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेज म्हणजेच डीएम्स प्रायव्हेट राहणार नाही.

Instagram End-to-End Encryption : जर तुम्ही इंस्टाग्रामवर चॅटिंग करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी 8 मे 2026 नंतर इंस्टाग्रामवर चॅटिंग करणे पूर्वीइतके सुरक्षित राहणार नाही. मेटा कंपनीने या प्लॅटफॉर्मवरून ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’ (End-to-End Encryption) बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मेटाने दिलेल्या माहितीनुसार, ८ मे २०२६ नंतर इंस्टाग्रामवरील मेसेजेसना ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’चे संरक्षण मिळणार नाही. कंपनीने तसे नोटीस पाठवून युजर्सना सूचित करण्यास सुरुवात केली आहे.
इंस्टाग्रामने एंट-टू-एंड एन्क्रिप्शन मेसेज फीचर बंद केल्यानंतर तुमच्या इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेज म्हणजेच डीएम्स प्रायव्हेट राहणार नाही. याचा अर्थ मेसेजवरुन एंड-टू-एंड एन्क्रिप्शन संपवलं जाईल. Instagram End-to-End Encryption
व्हॉट्सअॅप प्रमाणे इंस्टाग्रामवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन डिफॉल्टरित्या चालू नव्हता. हा फक्त काही भागांमध्ये उपलब्ध होता. यूझर्सला हे फीचर प्रत्येक चॅटमध्ये मॅन्युअली ऑन करावे लागत होते. मेटाचे प्रवक्ता म्हणाले की, खुप कमी लोक या फीचरचा वापर करत होते.
यामुळे कंपनी हे हटवण्याचा निर्णय घेत आहे. कंपनीचे प्रवक्ता म्हणाले की, की ‘खुप कमी लोक इंस्टाग्राम DMs मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचा वापर करत होते. यामुळे येत्या महिन्यात हे ऑप्शन हटवले जाईल. एखादा यूझर एन्क्रिप्टेड मेसेजिंग जारी ठेवू इच्छित असेल तर ते व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतात.’ Instagram End-to-End Encryption
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन दीर्घकाळापासून वादाचा विषय ठरला आहे. अनेक सरकारी आणि चाइल्ड सेफ्टी संघटना मानतात की, ही टेक्नॉलॉजी ऑनलाइन स्कॅमर्स आणि लहान मुलांना निशाणा बनवणाऱ्यांना लोकांना पकडणे अवघड करु शकते.
या बदलाचा नेमका परिणाम काय होईल?
‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’ संपणे म्हणजे तुमचे मेसेजेस आता पूर्णपणे खाजगी राहणार नाहीत. आतापर्यंत तुमचे मेसेजेस फक्त तुम्ही आणि समोरची व्यक्तीच वाचू शकत होती, पण आता मेटा कंपनीलाही या चॅट्सचा अॅक्सेस मिळणार आहे. म्हणजेच, तुमच्या संभाषणावर कंपनीची नजर असू शकते.
विशेष म्हणजे, डिसेंबर २०२३ मध्ये सुरू केलेली ही सुरक्षा सुविधा तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच बंद केली जात आहे.
युजर्सकडे दूसरा पर्याय काय असणार ?
ज्या युजर्सना आपल्या चॅटिंग डेटाची चिंता आहे, त्यांच्यासाठी मेटा लवकरच नवीन मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. यामध्ये युजर्सना त्यांचा चॅटिंग डेटा आणि मीडिया (फोटो, व्हिडिओ) कसा डाऊनलोड करता येईल, याची माहिती दिली जाईल. Instagram End-to-End Encryption Instagram End-to-End Encryption
हेही वाचा:






