Natasha Stankovic: सर्बियन मॉडेल, अभिनेत्री आणि नृत्यांगना नताशा (Natasha Stankovic) हिने ४ मार्च रोजी आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवसानिमित्त नताशाने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले असून, चाहत्यांकडून त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Natasha Stankovic या फोटोंमध्ये नताशा अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा आकर्षक वन-पीस ड्रेस परिधान केला असून हातात पांढऱ्या रंगाचा सुंदर केकही दिसत आहे. साधा पण एलिगंट लूक आणि आत्मविश्वासपूर्ण स्टाईलमुळे तिचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. Natasha Stankovic Natasha Stankovic भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या नात्यामुळेही नताशा भारतात विशेष चर्चेत आली होती. दोघांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले होते; मात्र लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. Natasha Stankovic नताशा आणि हार्दिक यांना ‘अगस्त्य’ नावाचा मुलगा असून, दोघेही मिळून त्याचा सांभाळ करत आहेत. वैयक्तिक आयुष्यातील बदलांनंतरही नताशा आपल्या करिअर आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहताना दिसते. Natasha Stankovic दरम्यान, वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. अनेकांनी कमेंट्सद्वारे नताशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.