Paris Olympics 2024 (Hockey) : कर्णधार हरमनप्रीतच्या गोलमुळे टीम इंडियाचा टळला पराभव, अखेरच्या दोन मिनिटांत ‘असा’ फिरला सामना…

Paris Olympics 2024 (Hockey, India vs Argentina) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव करून विजयी सुरुवात करणाऱ्या भारताच्या हॉकी संघाला दुसऱ्या सामन्यात चांगलाच संघर्ष करावा लागला. हॉकी टीम इंडियाला न्यूझीलंडनंतर अर्जेटिंनावर मात करुन सलग दुसरा विजय मिळवण्यात अपयश आलं आहे. भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.
वास्तविक, भारतीय संघाने अगदी शेवटच्या क्षणी सामन्याचे चित्र फिरवले . टीम इंडिया जवळपास 58 मिनिटे 1-0 ने पिछाडीवर होती. मात्र यानंतर अखेरच्या मिनिटांत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम उत्साह दाखवला. भारतीय संघासाठी हरमनप्रीत सिंगने शेवटच्या मिनिटांत गोल करत टीम इंडियाचा निश्चित वाटत असलेला पराभव टाळला.
The #MenInBlue stage a dramatic late come-back in their second Men’s Hockey Group Stage match at the #Paris2024Olympics and secure a 1-1 draw against Argentina.
India will play Ireland on July 30. pic.twitter.com/OkpQmPBpGm
— SAI Media (@Media_SAI) July 29, 2024
अर्जेंटिनाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये एक गोल करत 1-0 ने आघाडी घेतली होती. यानंतर भारतीय खेळाडू गोल करण्यासाठी संघर्ष करत राहिले, मात्र त्यांना यश मिळाले नाही. या काळात भारतीय खेळाडूंना गोल करण्याच्या संधी मिळाल्या, मात्र यश मिळवता आले नाही. मात्र अखेरच्या क्षणी भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. वास्तविक, हरमनप्रीत सिंग गोल करण्यात अपयशी ठरला असता तर कदाचित टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले असते. मात्र या गोलमुळे भारताचा पराभव टळला.
धाकधाकू वाढली अन्….
अर्जेंटिनाचा खेळाडू लुकास मार्टिनेझने सामन्याच्या 22 व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सामना संपायला अवघ्या 2 मिनिटांचा अवधी होता. टीम इंडियाच्या चाहत्यांची धाकधुक वाढायला लागली होती. मात्र कॅप्टन हरमनप्रीत सिंह याने 1 मिनिटं आणि 45 सेकंदांचा वेळ शेष असताना म्हणजे 59 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या साह्याने गोल केला आणि भारताला 1-1 ने बरोबरी साधून देत पराभव टाळला. आता पुढील सामन्यात भारतीय संघासमोर आयर्लंडचे आव्हान असणार आहे. मंगळवारी भारत आणि आयर्लंड आमनेसामने येणार आहेत.





