“भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास रचला आहे. आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने १५७ च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे. २७ वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरे गेली. विरोधी पक्षांना वाटलं २७ वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र, या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं मी म्हटलं होतं. ते निकालातून दिसले आहे,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
“गुजरातेत ‘आप’मुळेच काँग्रेसला मोठा फटका बसलाय”, अजित पवार यांची प्रतिक्रिया!
त्याचबरोबर, हिमाचल प्रदेशाचाही निकाल आज जाहीर होणार आहे. मात्र याठिकाणी काँग्रेसने सरशी दाखवली आहे. हिमाचलच्या ६८ जागांपैकी ३९ ठिकाणी काँग्रेसची आघाडी असून भाजप २६ ठिकाणी वरचढ दिसत आहे. त्यामुळे आता गुजरात भाजपकडे तर हिमाचल प्रदेश काँग्रेसकडे राहणार आहे. यादरम्यान, दोन्ही राज्यांमधील निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेल्या आपला मात्र अपयश आले आहे.






