गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या आज निकाल जाहीर होणार आहेत. त्याचबरोबर या निवडणुकांचे आकडेही समोर येऊ लागले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत गुजरातेत भाजपने यावेळी मोठी सरशी साधल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण गुजरात विधासभेसाठी १८२ जागा असून यापैकी जवळपास १५५ जागांवर भाजपचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुजरात निवडणुकांच्या या चित्राबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Gujarat Election Results 2022 : भाजप ऐतिहासिक विजयाकडे… 150 चा आकडा देखील होऊ शकतो पार
गुजरातमध्ये भाजप आघाडीवर असल्याने त्यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे. त्याचबरोबर काँग्रेसला यंदाच्या गुजरात निवडणुकांमध्ये मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की,”आप पक्षाने एक प्रकारे भाजपला गुजरात निवडणूक जिंकण्यात मदत केली आहे. त्यांच्यामुळेच काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.”असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर, हिमाचल प्रदेशाचाही निकाल आज जाहीर होणार आहे. मात्र याठिकाणी काँग्रेसने सरशी दाखवली आहे. हिमाचलच्या ६८ जागांपैकी ३९ ठिकाणी काँग्रेसची आघाडी असून भाजप २६ ठिकाणी वरचढ दिसत आहे. त्यामुळे आता गुजरात भाजपकडे तर हिमाचल प्रदेश काँग्रेसकडे राहणार आहे. यादरम्यान, दोन्ही राज्यांमधील निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेल्या आपला मात्र अपयश आले आहे.