Hinjewadi Crime : हिंजवडीत हॉटेल कामगारावर जीवघेणा हल्ला; आरोपीवर गुन्हा दाखल
Hinjewadi Crime : हिंजवडी फेज-२ येथील कॅफेमध्ये चहा देण्यास उशीर झाल्याच्या रागातून कामगारावर अमानुष हल्ला; आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

Hinjewadi Crime – एका कॅफेमध्ये अगोदरच्या ग्राहकांना प्रथम चहा देतो त्यानंतर तुम्हालाही देतो, असे कामगाराने सांगितल्याच्या कारणावरून कामगारावर बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज-२ येथे घडली.अथर्व उत्तम पारवे (वय २३, रा. टीसीजी अपार्टमेंट, माण रोड, मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
रविंद्र नारायण पवार असे जखमी कामगाचे नाव आहे. गणेश जालींदर लोहकरे (वय २९, रा. माण रोड, मुळशी) यांनी शुक्रवारी (दि. ६) हिंजवडी पोलीस ठाण्यपात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये आला. त्याने कामगार रविंद्र पवार यांच्याकडे चहा मागितला.
मात्र तुमच्या आधीच्या ग्राहकांना चहा देतो मग तुम्हालाही देतो, असे सांगितले. या कारणावरून संतापलेल्या आरोपीने काऊंटरवरून उडी मारून आत प्रवेश केला. कामगाराला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपीने चहा ढवळण्याच्या पळीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली. कामगाराच्या गुप्तांगावरही मारहाण केली. या प्रकरणाचा तपास हिंजवडी पोलीस ठाणे करीत आहे.





