पुणे जिल्हा: सविंदणे येथील विद्यालयात हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा

शिरूर : श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे येथे हिंदी अध्यापक प्रमोद भोईर, स्वाती तांबे व प्राचार्य शारदा मिसाळ यांनी हिंदी दिनाचे आयोजन केले होते. विद्यालयातील भरत थोरात यांनी विद्यार्थ्यांसमोर’ मेरा रंग दे बसंती चोला’ हे देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले.
दैनंदिन जीवनामध्ये आपण हिंदी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या शारदा मिसाळ या होत्या. त्यांनी अध्यक्षीय भाषणात हिंदी भाषेचे व हिंदी दिन साजरा करण्याचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ग्रंथालयातील पुस्तके वाचून आपल्या ज्ञानामध्ये भर पाडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘हिंदी भाषा देश की भाषा’ हे नृत्य सादर केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी फटांगडे व आभार सुलक्षणा दुसाने यांनी मानले.





