श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणेच्या शिरपेचात मानाचा तुरा

शिरूर | बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटातील मुलांनी प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धांमध्ये शिरुर तालुक्यात कबड्डी स्पर्धेमध्ये श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने बाजी मारून प्रथम क्रमांक मिळवला.
संघातील खेळाडूंची नावे : संघाचा कॅप्टन साहिल नरवडे, आर्यन बोऱ्हाडे, प्रणव चव्हाण, सचिन पोळ, ओम नरवडे, साई कुरकुटे, गिरीश मेचे, श्रवण पडवळ, राजवर्धन पडवळ, रविराज आगे यांनी चांगली कामगिरी करून विद्यालयास विजय मिळवून दिला.
सविंदणे गावच्या सरपंच शुभांगी पडवळ, विद्यालयाच्या प्राचार्या शारदा मिसाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन लंघे, जूनियर कॉलेज व्यवस्थापन समितीचे सचिव बाळासाहेब पडवळ यांनी विजयी संघाचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे प्रमोद भोईर, गणेश शेळके, कंठाळी सर, चव्हाण सर यांचे अभिनंदन केले.
=====





