Gramin News : जि. प. प्राथ. शाळा सविंदणे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भोर
Updated On:

शिरुर : शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा येथील कार्यरत व्यवस्थापण समितीची मुदत संपली होती. त्यामुळे शनिवार दि. २८ सप्टेबर रोजी पालक सभेतून नवीन व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. त्यामध्ये बाळासाहेब भोर यांची अध्यक्षपदी , तर प्रदीप पडवळ यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
शिक्षक प्रतिनिधी म्हणून दत्तात्रय चिकटे सर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक रमेश बोखारे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक गणेश पवार यांनी आणि आभार लहू शितोळे यांनी मांडले.
पुढील दोन वर्षांमध्ये शाळेची भौतिक व शासकीय गुणवत्ता वाढवण्याचे त्यांच्या मनोगतातून सांगितले आहे. व्यवस्थापन समितीमार्फत शाळेचा लोकसहभागातून विकास करून दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देवू असे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब भोर यांनी सांगितले.





