प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान म्हणाली, ‘कृपया मदत करा….’

Hina Khan Cancer Update: स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान आता अल्लाहवर अवलंबून आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी सर्जरीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये तिच्या पोटावर तीन कटाच्या खुणा दिसत होत्या.

दरम्यान, अभिनेत्रीने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तीने कॅन्सरवर मदत मागताना लोकांना दान करण्याचे आवाहन केले आहे.
हिना खानने अल्लाहची प्रार्थना केली –
सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना अभिनेत्री हिना खानने लिहिले की, “सब्र… सचमुच अल्लाह धीरज वालों के साथ हैं (Sabra… Indeed Allah is with the patient)”

आणखी एक पोस्ट शेअर करत तीने लिहिले, “हा असा अध्याय आहे जिथे अल्लाह तुमच्या प्रार्थना स्वीकारतो आणि तुमच्या स्वप्नांना सत्यात बदलतो.”
हिना खानने लिहिले कृपया मदत करा; देणगी देण्याचे आवाहन –

एकीकडे हिना खान कॅन्सरशी लढा देत आहे तर दुसरीकडे ती कॅन्सरग्रस्त लोकांनाही मदत करत आहे. अलीकडेच, तिच्या एका पोस्टमध्ये, अभिनेत्रीने लोकांना नीलम शर्मा कट्टो नावाच्या महिलेच्या मदतीसाठी देणगी देण्याचे आवाहन केले आहे, ज्यांना कर्करोग आहे.
आता कोणतेही औषध काम करत नाही – हिना खान
गेल्या महिन्यात हिना खानचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती रडताना दिसत होती. व्हायरल व्हिडिओमध्ये हिना म्हणाली होती की, आता कोणतेही औषध काम करत नाही. जशी होती, अजूनही तशीच आहे. ही खूप लांबची प्रक्रिया आहे, पण काय करावे, हे जीवन आहे.






