“मला तिच्या सेलिब्रिटी असण्याचा फायदा होतो, पण…”; हिना खानच्या पतीचे ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर

Hina Khan Husband Rocky Jaiswal | अभिनेत्री हिना खान आणि तिचा नवरा रॉकी जैस्वाल सध्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. मात्र इतर सेलिब्रिटीप्रमाणे दोघानांही ट्रोलिंग सामना करावा लागतो. अशातच आता रॉकीने, पत्नी हिना खानच्या प्रसिद्धीचा वापर तो करत असल्याची टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, “मी हिनाच्या प्रसिद्धीचा तिच्या पैशांचा माझ्या फायद्यासाठी वापर करतो, असे काही लोक म्हणतात. पण मी स्पष्टपणे सांगतो, मी हिनाएवढे पैसे नक्कीच कमवत नाही. ती स्टार आहे, मला तिच्या सेलिब्रिटी असण्याचा फायदा होतो का, तर हो नक्कीच होतो. पण, या कारणामुळे आम्ही एकत्र नाही.”
लोक हिनाला ओळखतात म्हणून…
“मला या गोष्टीची अजिबात काळजी वाटत नाही. कारण मला माहीत आहे की, जर मी हिनाबरोबर कुठे गेलो, तर तिला जास्त लोक ओळखणार, तिच्यावर प्रेम करणार, तिला जास्त प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळणार. पण, यामुळे मला राग का येईल? लोक तिला ओळखतात म्हणून मी तिच्यावर प्रेम करत नाही. तर मला वाटते, फक्त एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवणं जास्त महत्त्वाचं आहे,” असे म्हणत त्याने ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.
दरम्यान, हिना खानला कॅन्सरचे निदान झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. ज्यावेळी हिनावर केमो सुरू होते, त्यावेळी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घेताना अनेकदा रॉकी दिसला. याचदरम्यान, रॉकीने तिच्यासोबत लग्नगाठ बांधली. ज्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अलीकडेच दोघे ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात सहभागी झाले. Hina Khan Husband Rocky Jaiswal |
हेही वाचा:





