Hina Khan | अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी लढा देत असून या कठीण काळातील प्रत्येक गोष्ट ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अलीकडेच ती लग्नबंधनात अडकली. त्यानंतर आता हिना ‘पती पत्नी और पंगा’ या रिॲलिटी शोमधून तिचा पती रॉकी जैस्वालसोबत पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अनेक सहकाऱ्यांनी तिला मानसिक आधार दिला होता. कॅन्सरशी सामना करताना तिला काही काळापर्यंत अभिनयापासून दूर राहावं लागलं होतं. मात्र आता ती पुन्हा कामाच्या दुनियेत परतण्याचा निर्धार करून सज्ज झाली आहे. Hina Khan| हिनाने ‘ये रिश्ता क्या कहलाता है,’ ‘खतरों के खिलाडी ८’ आणि ‘बिग बॉस ११’ यांसारख्या शोमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ‘पती पत्नी और पंगा’च्या माध्यमातून ती नवा टप्पा गाठणार आहे. लग्नानंतर पती रॉकी जैस्वालसोबत तिचा हा पहिला प्रकल्प आहे. Hina Khan| 11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हिना अडकली लग्नबंधनात 11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हिना आणि रॉकी लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांनीही 2014 मध्ये डेट करण्यास सुरुवात केली. रॉकीने प्रत्येक अडचणीत हिनाची साथ दिली. कर्करोगाशी तिची सुरू असणारी झुंज म्हणा अथवा हिनाच्या वडिलांचे निधन झाले तेव्हाही रॉकी तिच्यापाठी खंबीरपणे उभा राहिला होता. Hina Khan| हेही वाचा : Rohit Pawar : लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखं, रमेश कराडांच्या विधानावर रोहित पवारांचा संताप