Weather Update : देशात सर्वाधिक तापमान ‘या’ भागात; उष्णतेचा पारा 45.6 अंश सेल्सिअसवर

Weather Update – विदर्भात सूर्य कोपला असून सोमवारी (२१ एप्रिल) देशात चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे कमाल ४५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरनंतर ब्रह्मपुरी येथे ४५, अमरावती ४४.६ आणि अकोला येथे ४४.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंदवण्यात आले.
दरम्यान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, काेकणात पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियस तापमान वाढ हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू उष्ण तापमानात घट हाेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गडचिरोली ४३, वर्धा ४३.४, यवतमाळ ४३.४, नागपूर ४३.६, वाशिम ४२.५, गोंदिया ४२.१ व बुलडाणा येथे ३९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. येणाऱ्या दिवसात पारा सतत चढता राहणार असूनविदर्भात उष्णतेची लाट राहील, असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.
उन्हाची तीव्रता पाहता नागपुरातील १३ चौकांतील सिग्नल दुपारी १ ते ४ या वेळेत रेड ब्लिंकवर ठेवले गेले. या वेळेत नागरिकांना या १३ चौकांत थांबावे लागणार नाही.
प्रमुख शहरांचे तापमानः
छत्रपती संभाजीनगर ४०.९
नाशिक ३८.४
जळगाव ४२.०
सोलापूर ४३.०
अहिल्यानगर
पुणे ४२.९.





