मुळव्याध करेल नाहीशी, जाणून घ्या जितसायाची औषधी फायदे

जितसायाची झाडे हिंदुस्थानात कोठेही येतात. याची मोठमोठी झुडपे असून साल पातळ, गुळगुळीत, पिंगट रंगाची असते. पाने अडुळशासारखी असून ती समोरासमोर असतात. याची फुले पांढरी असतात. कोणी कोणी याच्या फळांचे लोणचेदेखील करतात. शेतकरी लोक या झाडाच्या पानांचा जमीन खतविण्याच्या कामी उपयोग करतात.

मुलांच्या पोटातील विकारावर ( jitasaya benefits ) :

या झाडाचा मुख्य औषधी उपयोग मुलांच्या पोटातील विकारांवर होतो. याच्या मुळाची दीड ग्रॅम पूड लहान मुलांना मधातून द्यावी, पोटातील सर्व विकार बरे होतात.

मुळव्याधीवर पानांचा काढा करून मूळव्याध झालेल्या रोग्यांना दिला असता रक्‍त थांबते व आराम वाटतो.

अरूचीवर( jitasaya benefits ) :

जितसायाच्या फळांचे लोणचे तोंडाची अरूची दूर करते.

पोट साफ होण्यासाठी :

जितसायाचे चूर्ण मधातून घेतले असता पोटाचे विकार बरे होतात. याचे मूळ तांदळाच्या पेजेत उगाळून त्यात थोडी सुंठ घालून ते मिश्रण उदराच्या रोग्यास दिले असता उदरशूल बरा होतो. अशाप्रकारे जितसाया हे औषधी झाड आहे.( jitasaya benefits )

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.