राज्यात उकाडा वाढला; चंद्रपूरचे तापमान ४४ अंशावर, नागरिक हैराण

Maharashtra Weather Update | राज्यातील काही भागात तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यातील झालेल्या तापमान वाढीमुळे नागरिकही हैराण झाले आहेत. राज्यात रविवारी चंद्रपूरने सर्वात जास्त म्हणजे ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता आणखी वाढणार आहे. आज विदर्भातील नागपूर आणि अकोला येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज असून या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
20 April, Tmax Maharashtra
Parbhani 42.4°c
PUNE 38.7
Beed 42.3
Chikalthana 41.6
Baramati 40.2
Satara 39.9
Solapur 43
Udgir 40.8
Jeur 42
Sangli 38.7
Dharashiv 41.8
Jalgaon 41
Jeur 42
Malegaon 42.8 pic.twitter.com/BWxhmUMGdq— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 20, 2025
चारजिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आणि उष्ण हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Maharashtra Weather Update |
विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि ब्रह्मपुरी या शहरांमध्ये देखील सर्वात जास्त तापमान होते. विदर्भातील अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या वर आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्येही तापमानाचा पारा ४३ अंशावर गेला आहे.
उन्हाची तीव्रता आणखी वाढणार
दरम्यान, राज्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील ३ ते ४ दिवस विदर्भातील अनेक शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचवेळी काही जिल्ह्यांत हवामान विभागाने तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. Maharashtra Weather Update |
हेही वाचा:
“तुतारी गटानेही अजित पवारांच्या नेतृत्वात एकत्र यावं,”; अमोल मिटकरींचे आवाहन





