“तुतारी गटानेही अजित पवारांच्या नेतृत्वात एकत्र यावं,”; अमोल मिटकरींचे आवाहन

Amol Mitkari | उद्धव ठाकरे आणि आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी सकारात्मक संकेत दिल्याने मनसे-ठाकरे गटाच्या युतीची शक्यता आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत.
ठाकरे गटानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी ट्विट करत ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावर समाधानकारक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर अजित पवार गटातील अमोल मिटकरींकडूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावं असे विधान केले आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा स्वागतच आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा आदर्श घेऊन तुतारी गटानेही अजित दादांच्या नेतृत्वात एकत्र यावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात भक्कम होण्यासाठी जर तुतारी गटाला वाटत असेल तर त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं’ असे आवाहन त्यांनी केले. Amol Mitkari |
रोहित पवार काय म्हणाले होते? Amol Mitkari |
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत करत सर्वच कुटुंबांनी एकत्र यावं असं म्हटलं होतं. मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं होतं. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत असल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होते. यावर आता अमोल मिटकरींनी देखील प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा:
राहुल गांधींचा ब्राउन विद्यापीठात हल्लाबोल ; महाराष्ट्र निवडणुकीवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप





