देशभरात उष्णतेची लाट ! ‘या’ शहरात पारा चाळीशी पार..

पुणे – शहर आणि लगतच्या परिसरांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली असतानाच राज्यासह देशभरात उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवसांत तापमानात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू, नका असे आवाहनही करण्यात आले आहे.
याबाबत हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्यासह देशात काही दिवस तापमान सुमारे 2 ते 4 अंश सेल्सियसने वाढण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात तापमान वाढणार
पुणे आणि परिसरात दि. 20 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या काळातच 2 ते 3 अंशांनी तापमान वाढ होऊ शकते. त्यामुळे दुपारच्यावेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
बहुतांश शहरे चाळिशी पार
अहमदाबाद- 41.9, अकोला – 42.8, अलाहाबाद – 44.6, बरेली – 40.5, कोलकाता – 40.0, ग्वाल्हेर – 41.7, जमशेदपूर- 42.5, लखनौ-41.5, नागपूर-40.9, नवी दिल्ली – 40.6, पाटणा-43.2, राजकोट-41.5, वाराणसी-42.2.





