Abhishek Sharma : ‘तो लढेल-रडेल पण ‘ती’ गोष्ट कोणाला देणार नाही…!’, युवराज सिंगचा अभिषेकबद्दल खुलासा, पाहा VIDEO

अभिषेकचे युवराज सिंगसोबतच आहे खास नाते –
अभिषेक शर्माने टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगकडून क्रिकेटचे बारकावे शिकले आहेत. युवराजने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या दोघांचे एकत्र सराव करतानाचे आणि खास क्षणांचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाले आहेत, जे त्यांच्या गुरू-शिष्याच्या खास नात्याची साक्ष देतात.
युवराजने केला अभिषेकच्या बॅटबद्दल मोठा खुलासा –
Yuvraj Singh spills the funniest truth about Abhishek Sharma.
“You can take anything from Abhishek Sharma, but nobody can take a bat from him. He’ll fight for it, maybe even cry, but he won’t give you a single one. Even if he has 10 bats, he’ll still say, I only have two!” pic.twitter.com/L6lHoRAcch
— GillTheWill (@GillTheWill77) November 8, 2025
याच संदर्भात, युवराज सिंग आणि अभिषेक शर्मा यांच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे, ज्यात युवराजने अभिषेकबद्दल एक मजेशीर आणि खास सिक्रेट उघड केले आहे. युवराज या मुलाखतीत गंमत करत म्हणाला, “तुम्ही अभिषेक शर्माकडून काहीही घेऊ शकता, पण त्याच्याकडून त्याची बॅट कोणीच घेऊ शकणार नाही. तो एखाद्या वेळी लढेल, मार खाईल, रडेल, पण आपली बॅट देणार नाही.”
युवराजने पुढे खुलासा केला की अभिषेक आपल्या बॅटची खूप काळजी घेतो आणि त्याच्याकडे नेमक्या किती बॅट आहेत हे तो सतत मोजत असतो. तो म्हणाला, “त्याच्याकडे दहा बॅट असतील, तरी तो म्हणेल, ‘माझ्याकडे फक्त दोनच बॅट आहेत, दोन किटबॅगमध्ये असतात; ४ घरी असतात.’ त्याने माझ्या बऱ्याच बॅट घेऊन गेला, मी कधी नको नाही म्हटलं त्याला, पण स्वतःची बॅट तो कधीच देत नाही.” यावरून अभिषेक शर्माच्या क्रिकेट बॅटबद्दलच्या प्रेमाची आणि काळजी घेण्याच्या सवयीची कल्पना येते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ठरली खास!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीचा जलवा दाखवला. तो या मालिकेत १६३ च्या स्ट्राईक रेटसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याच्या या सातत्यपूर्ण आणि आक्रमक कामगिरीमुळे तो सध्या आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे आणि प्रत्येक मालिकेत आपले स्थान अधिक पक्के करत आहे.





