Kranti Gaud : क्रांती गौडची यशोगाथा; १३ वर्षांनंतर वडिलांना परत मिळणार सन्मानाची नोकरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन: वडिलांना नोकरी परत मिळण्याचा मार्ग मोकळा –
क्रांती गौडचे वडील मुन्ना सिंह यादव हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत होते, पण २०१२ मध्ये त्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून काढून टाकण्यात आले होते. या घटनेनंतर क्रांतीच्या कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागला. काही दिवसांपूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने वडिलांना त्यांचा गौरव परत मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तिची ही इच्छा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
बुंदेलखंड की बेटी ने रचा इतिहास। प्रदेश का नाम किया रोशन। Kranti Gaud के घर पहुंची INH24X7 की टीम#iccwomensworldcup2025 #womensworldcup2025 #KrantiGaud #krantigaudnews pic.twitter.com/uyXkGfBMdH
— INH 24X7 (@inhnewsindia) November 9, 2025
शुक्रवारी भोपाळमध्ये मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते क्रांती गौडचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी क्रांतीच्या वडिलांना नियमानुसार पुन्हा नोकरीवर घेण्याचे आश्वासन दिले. सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले, “संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी क्रांतीने केली आहे. तिच्या कुटुंबाच्या अडचणींबद्दल मला माहिती मिळाली आहे. राज्य सरकार सध्याच्या नियमानुसार तिच्या वडिलांना पुन्हा कामावर घेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू.” मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
हेही वाचा – IND A vs SA A : मोहम्मद सिराज आणि आफ्रिकन फलंदाजामध्ये मैदानातच जुंपली, VIDEO होतोय व्हायरल
दिवसाच्या एका वेळेच्या अन्नासाठीही संघर्ष –
Desi bitiya ka desi andaaj.. #krantigaud..💐💐 world champion pic.twitter.com/mexTGn6MPU
— Deepali Sharma (@DeepaliSharmaa) November 9, 2025
वडिलांना पोलीस दलातून काढल्यानंतर क्रांतीच्या कुटुंबाला मोठा आर्थिक संघर्ष करावा लागला. क्रांतीने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा त्यांना दिवसाच्या एका वेळेच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिच्या भावाला रोजंदारीवर तसेच बस कंडक्टर म्हणूनही काम करावे लागले. मात्र, आता विश्वचषक विजयानंतर क्रांतीसह तिच्या कुटुंबालाही चांगले दिवस आले आहेत. क्रांती गौडच्या कामगिरीमुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विश्वचषकातील कामगिरी आणि अन्य घोषणा –
विश्वचषकातील ८ सामन्यांमध्ये क्रांती गौडने ९ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तिने २० धावा देऊन ३ विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरी केली होती. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात शतकवीर ॲलिसा हिलीला बाद करून तिने ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखत महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
याच सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी १५ नोव्हेंबर रोजी जबलपूरमध्ये बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी अभिमान दिन साजरा करण्याचे आणि छतरपूरमध्ये नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्याचीही घोषणा केली. विश्वचषक विजयानंतर छतरपूरची क्रांती गौड आपल्या गावातील लोकांबरोबर आनंद साजरा करताना दिसली.





