Sanjay Raut : “… अशा प्रकारच्या टपल्या मारण्यात पटाईत” ; राऊतांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या अॅाफरवरून फडणवीसांवर साधला निशाणा

Sanjay Raut : विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाल संपल्याने उबाठा गटाचे अंबादास दानवे यांना निरोप देण्यात आला. विधिमंडळाच्या बाहेर खास फोटोसेशन करण्यात आले. या फोटोसेशनमध्ये बसण्यावरून सुरू असलेला खेळ कॅमेऱ्यात कैद झाला. या फोटोसेशनची जोरदार चर्चा झाली.
तत्पूर्वी विधानपरिषदेत दानवेंना निरोप देण्याच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना या बाजूने यायचं असेल तर बघा इकडे यायला स्कोप आहे, अशी अॅाफर दिली. आता या विधानावर उबाठाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या खास शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या टपल्या मारण्यात पटाईत आहेत, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या शेजारी सध्या डुप्लीकेट लोकं बसलेत. अशा लोकांसोबत बसायचं की खऱ्या लोकांसोबत बसायचं याचा विचार त्यांनी आधी करावा, असा सल्ला राऊतांनी फडवीसांना दिला. राऊतांनी या विधानातून एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले होते फडणवीस?
तुम्हाला या बाजूने यायचं असेल तर बघा, कारण 2029 सालापर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाण्याचा स्कोप नाहीये, असे विधान करत फडवीसांनी उद्धव ठाकरेंना अॅाफर दिली. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात खसखस पिकली, पण त्याच विधानामुळे चर्चांना उधानही आले होते.
राऊतांचा टोला
फडणीसांच्या याच विधानावर राऊतांनीही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस आहेत ते अशा प्रकारच्या टपल्या, टिचक्या, टोमणे मारण्यात पटाईत आहेत. त्यानुसार त्यांनी टोमणा मारला आसेल पण ते एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. फडणवीसांची ऑफर अजिबात गांभीर्याने घेत नाही, टाळीची वाक्य असतात सिनेमात तसंच हे आहे, असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला.
सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लीकेट शिवसेनेसोबत सत्ता भोगत आहेत. डुप्लीकेट शिवसेना, डुप्लीकेट राष्ट्रवादी… त्यांना कुठलाही वैचारिक किंवा नैतिक आधार नाहीये, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा : ‘ते मुस्लिमांना हे सांगणार नाही…’ ; व्हायरल व्हिडिओवर अनिरुद्धाचार्य यांनी अखिलेश यांना दिले उत्तर





