IND vs AUS : टीम इंडियासाठी वाईट बातमी! सामन्याच्या मध्यात स्टार खेळाडूला झेल घेताना झाली गंभीर दुखापत, पाहा VIDEO

Shreyas Iyer Injured in IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीचा झेल पकडताना गंभीर जखमी झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 33.4 व्या षटकात हर्षित राणा याच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी (24 धावा) बाद झाला. कॅरीने हवेत खेळलेला फटका पकडण्यासाठी श्रेयस अय्यरने मागे धाव घेत शानदार झेल घेतला.
श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत –
Shreyas SUPERMAN Iyer! 💪
Puts his body on the line for #TeamIndia and gets the much needed wicket. 🙌💙#AUSvIND 👉 3rd ODI | LIVE NOW 👉 https://t.co/0evPIuAfKW pic.twitter.com/LCXriNqYFy
— Star Sports (@StarSportsIndia) October 25, 2025
मात्र, याच प्रयत्नात त्याला गंभीर दुखापत झाली. झेल घेताना त्याचा तोल गेला आणि तो खांदा आणि कंबरेवर जोरात जमिनीवर आदळला. चेंडू हातात टिकवण्याच्या नादात त्याला स्वतःला सावरता आले नाही आणि तो वेदनेने विव्हळू लागला.
हेही वाचा – IND vs AUS : संघ बदलला, कर्णधार बदलला, पण तरी संपेना साडेसाती! भारताने सलग १८व्यांदा केला ‘हा’ नकोसा विक्रम
दुखापत इतकी गंभीर होती की, मैदानावर तातडीने फिजिओ धावत आले. श्रेयसला सहकाऱ्यांच्या खांद्याचा आधार देत मैदानाबाहेर न्यावे लागले. त्याच्या या दुखापतीमुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. श्रेयसच्या दुखापतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु त्याच्या अनुपस्थितीत संघाच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – IND vs AUS : ट्रॅव्हिस हेडचा विक्रमी धमाका! स्टीव्ह स्मिथला मागे टाकत रचला नवा इतिहास
टीम इंडियाचे सामन्यात जबरदस्त कमबॅक –
Rohit Sharma checking on Shreyas Iyer after that injury. 🥹🤌🏻
The bond between the two.❤️ pic.twitter.com/QRZCF2CYY5
— Rohan💫 (@rohann__45) October 25, 2025
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मिशेल मार्शच्या नेतृत्वाखाली खेळाला सुरुवात केली. मात्र, भारतीय संघाने देखील आता सामन्यात दमदार पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाने 43 षटकानंतर सात बाद 217 धावा केल्या आहे. भारताकडून आतापर्यंत वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांनी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या आहेत.





