‘AI’ चा करिष्मा बघितला का? ‘विराट आणि धोनी’चा फिमेल लुक होतोय प्रचंड व्हायरल…

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे मने जिंकत असतात. विराट कोहलीचा स्मार्टनेस कोणत्याही अभिनेत्यापेक्षा कमी दिसत नाही. तर भारताचा माजी कर्णधार धोनी हा देखील त्याच्या नवनवीन लूक मुळे चर्चेत असतो.
परंतु हे दोघेही फिमेल लुकमध्ये कसे दिसतील याचा कधी विचार केला आहे का? तर आता ‘AI’ ने आपला करिष्मा दाखवत विराट आणि धोनीचा फिमेल लुक समोर आणला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या या दोन्ही खेळाडूंच्या या लुकने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
दरम्यान, धोनी आणि विराट हे दोघेही महिला लूकमध्ये कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाहीत. सोशल मिडियावरचा खेळाडूंचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
काहीजण कोहलीचे गुणगान गात आहेत, तर काही जण धोनीच्या फोटोचे चाहते असल्याचे सांगितले आहे. सध्या सगळीकडे हे फोटो चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर मजेशीर कमेंट करताना दिसून येत आहे.
दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ज्याला आपण ‘AI’ म्हणून ओळखतो. सध्या या तंत्रज्ञानाने सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. आयटी ते अगदी चित्रकला क्षेत्रापर्यंत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ची किमया आपल्याला पाहायला मिळतेय.





