Mohammed Shami : ‘शमीला अहंकार; मुलीशी संपर्क नाही!’, हसीन जहांची मोहम्मद शमीवर पुन्हा टीका

Mohammed Shami and Hasin Jahan Case : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चर्चेत आहे. मोहम्मद शमी आणि त्याची एक्स वाईफ हसीन जहां यांच्यात गेल्या सुमारे सहा वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे की, शमीने दरमहा चार लाख रुपये हसीन जहां आणि त्यांच्या मुलीला भरणपोषण भत्ता म्हणून द्यावेत.
कोर्टाच्या या निर्णयानंतर हसीन जहांचा वेगळाच मूड दिसून आला. तिने मोहम्मद शमीबद्दल बोलताना टीका केली आहे. ४ लाख रुपये मासिक भत्त्याचा निर्णय आल्यानंतर हसीन जहांने शमीबद्दल अशा काही गोष्टी बोलल्या, ज्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तिने कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा शमीवर खरमरीत टीका केली आहे.
गर्व भंग पावल्यावर आठवण येईल – हसीन जहाँ
हसीन जहां टीका करताना म्हणाली, “ज्याच्याकडे कधी काही नव्हतं, तो अचानक मोठा झाला आणि त्याला खूप गर्व झाला आहे. आता त्याला आपल्या बायकोची आणि मुलीची काळजीच नाही. जेव्हा हा गर्व भंग पावेल, तेव्हा त्याला आपली बायको आणि मुलगी या दोघींची आठवण येईल.”
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
न्यायालयाच्या या आदेशामुळे खूप मदत होईल – हसीन जहां
“Rs 4 lakh per month is too little considering Shami’s luxurious lifestyle. We had demanded Rs 10 lakh per month. We will go for a caveat.” — Hasin Jahan 🗣️ to PTI.
Seeking increased alimony from cricketer Mohammad Shami.
#MohammedShami #HasinJahan pic.twitter.com/Rz4xI5qJnu
— Cric Uneeb (@Cric_Uneeb) July 3, 2025
कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाने समाधानी दिसणाऱ्या हसीन जहांने सांगितले की, मोहम्मद शमी जशी जीवनशैली जगत आहेत, तशीच जीवनशैली जगण्याचा हक्क तिला आणि त्यांच्या मुलीला देखील आहे. न्यायालयाचे आभार मानताना हसीन जहांने सांगितले की, “आम्ही हा खटला २०१८ मध्ये दाखल केला होता. काही आर्थिक कारणांमुळे मी आतापर्यंत माझ्या मुलीला चांगल्या शाळेत शिकवू शकले नव्हते, परंतु न्यायालयाच्या या आदेशामुळे मला खूप मदत होईल.”
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलचा इंग्लंडमध्ये जलवा! सलग दोन कसोटीत शतकं ठोकत रचला इतिहास
हसीन जहां आणि मुलीशी शमीचा कोणताही संपर्क नाही –
View this post on Instagram
हसीन जहांने असा दावा केला आहे की शमी त्याच्या अहंकारामुळे तिच्याशी आणि त्यांच्या मुलीशी कोणताही संपर्क ठेवत नाहीत. गेल्या वेळी केवळ न्यायालयाच्या भीतीमुळे शमी आपल्या मुलीला भेटला होता. न्यायालयाने ठरवलेल्या देखभालीच्या रकमेवर हसीन जहाँ म्हणाली की, भरणपोषण जास्त असायला हवे होते, कारण तिने याचिकेत ४ लाखांपेक्षा जास्त रक्कम नमूद केली होती. अशा परिस्थितीत, हसीन जहाँ न्यायालयाच्या निर्णयावर निश्चितच खूश आहे पण तिला वाटते की ही रक्कम अजूनही कमी आहे.





