Shakti Shalini Movie : ‘किंग’मुळे ‘शक्ती शालिनी’चं प्रदर्शन पुढे ढकललं? अनित पड्डाच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट!
Shakti Shalini Movie : मात्र, निर्मात्यांकडून नव्या प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे खरंच प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे की, ठरलेल्या तारखेलाच हा चित्रपट प्रदर्शित होणार याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

Shakti Shalini Movie : मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील आगामी चित्रपट ‘शक्ती शालिनी’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सैय्यारा फेम अभिनेत्री अनित पड्डा मुख्य भूमिकेत चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट मार्च २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मात्र, निर्मात्यांकडून नव्या प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे खरंच प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे की, ठरलेल्या तारखेलाच हा चित्रपट प्रदर्शित होणार याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
‘किंग’सोबतची टक्कर टाळण्यासाठी निर्णय?
‘शक्ती शालिनी’ हा चित्रपट मूळ नियोजनानुसार २०२६ च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र, शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘किंग’ चित्रपटासोबत होणारी संभाव्य बॉक्स ऑफिस स्पर्धा टाळण्यासाठी प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.
शाहरुख खानचा ‘किंग’ हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत दोन्ही चित्रपट एकाच कालावधीत प्रदर्शित झाल्यास बॉक्स ऑफिसवर थेट स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, प्रदर्शनाची तारीख बदलण्यामागे हेच कारण असल्याची अधिकृत पुष्टी निर्मात्यांकडून झालेली नाही.
अनित पड्डा, विशाल जेठवा आणि नाना पाटेकर यांच्या भूमिका
‘शक्ती शालिनी’ हा मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी विश्वाचा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. या चित्रपटात अनित पड्डा आणि विशाल जेठवा यांच्यासह नाना पाटेकर यांची महत्वाची भूमिका आहे.
Shirur Crime News : तीन घटनांमुळे शिरूरमध्ये खळबळ! पोलिसांसमोर आव्हान; असं घडलं तरी काय?





