श्रद्धांजली : बुद्धिमान अभिनेत्याचा वियोग
मराठी रंगभूमी, सिनेमा आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनय सामर्थ्यानं आणि वेगळेपणानं स्वतःचा ठसा उमटवणारे नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या एकाएकी जाण्यामुळे मराठी-हिंदी कलाविश्व आणि असंख्य रसिकप्रेक्षक मनापासून हळहळले.

– किरण यज्ञोपवित
Nana Patekar : मराठी रंगभूमी, सिनेमा आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनय सामर्थ्यानं आणि वेगळेपणानं स्वतःचा ठसा उमटवणारे नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या एकाएकी जाण्यामुळे मराठी-हिंदी कलाविश्व आणि असंख्य रसिकप्रेक्षक मनापासून हळहळले.
नानाचं (Nana Patekar) व्यक्तिमत्त्व खूप विविधांगी पातळ्या असणारं होतं. एक गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व असं नाना काकाविषयी म्हणता येईल. त्याला समजून घेण्यासाठी विविध कोनांमधून पहावं लागायचं. नानाची वाटचाल खूप खडतर मार्गानं झाली. कलाक्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना चित्रपटसृष्टीत येणं आणि यशस्वी होणं, त्यांच्याभोवतीचं वलय कायम राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी अंगभूत कौशल्ये, ऊर्मी यांबरोबरच प्रचंड मेहनत घ्यावी लागते. संघर्ष करावा लागतो. नाना काकानं तो केला होता.
छबीलदासमध्ये ‘पाहिजे जातीचे’ या नाटकापासून सुरुवात करणार्या नानानं स्वतःचं एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व जोपासलं होतं. त्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पदर होते. त्यामध्ये काहीशी आक्रमकता होती, तशीच सहृदयता, संवेदनशीलपणाही होता. विविध कारणांनी आलेल्या प्रतिकूलतेतून, अडचणीतून बाहेर पडताना ही आक्रमकता माझ्यामध्ये आली आहे, असं तो नेहमी सांगायचा.
या अडचणींवर मात करत वाटचाल करत जात तो परिपक्व होत गेला. पण या प्रवासामध्ये त्याच्यातील आक्रमकताच हाच त्याचा चेहरा बनला. मग त्यानं कामंही तशा पद्धतीनंच निवडली. ‘अंकुश’ चित्रपटातून त्यानं स्वतःला सिद्ध केलं. त्यातून अभिनेता म्हणून तो सर्वसामान्यांसमोर (Nana Patekar) समोर आला. तत्पूर्वी ‘पुरुष’सारख्या नाटकांतून तो प्रसिद्ध झालाच होता.
या सर्वांमधून त्याची एक प्रतिमा निर्माण झाली. आक्रमक, अन्यायाला प्रतिकार करणारा, मनात येईल ते बोलणारा अशी प्रतिमानिर्मिती होत असताना त्याचा माणूस म्हणून उत्तम अभ्यास सुरू होता. नाना उत्तम वाचक होता. तो विचक्षण दृष्टीचा होता. स्वतःची शेती करण्यापासून, वाचन करणं, कार्यक्रमांना उपस्थित राहणं इतकंच नव्हे तर आजूबाजूला असणार्या लोकांची निवड करणं या सर्वांमधून तो विचक्षण असल्याचं दिसून आलं.
‘नाम’ फाउंडेशनच्या स्थापनेनंतर त्याच्यातील सहृदयी माणूस सर्वांना खर्या अर्थानं समजला. या माध्यमातून त्यानं उभा केलेला कार्याचा वटवृक्ष असंख्य कुटुंबांना आधाराची सावली देणारा ठरला. स्वतः आयुष्यात खूप मोठा संघर्ष केल्यामुळं त्याला इतरांचं दुःख चटकन समजायचं. शारीरिक कष्ट तर आहेतच पण मानसिक कष्टही त्याने घेतले. शेवटपर्यंत त्यांनी आपली बलदंड शरीरयष्टी राखली, याच्याशी या एकूण वाटचालीचा संबंध असावा, असं वाटतं.
रुढार्थानं चित्रपट-नाटक-मालिका या क्षेत्रांमध्ये नायक बनण्यासाठी आणि लोकप्रिय होण्यासाठी एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व असावं लागतं. पण नाना त्यापेक्षा वेगळा होता. तो एक असाधारण बुद्धिमान अभिनेता होता. असं म्हणण्याचं कारण म्हणजे त्याला या क्षेत्राची सर्वांगानं समज होती. केवळ आपल्या कामापुरता वा अभिनयापुरता त्याचा दृष्टिकोन मर्यादित नव्हता. त्याला साहित्याची उत्तम जाण होती, तशीच कवितेची जाण होती.
संहिता, तांत्रिक बाबीही त्याला समजत असत. तसंच कॅमेरा, एडिटींग, संगीत या सर्वांचंही त्याला उत्तम ज्ञान होतं. या सर्वांचे मिश्रण होऊन जोे एक बुद्धिमान माणूस होतो, तो म्हणजे नाना होता. असा माणूस स्वतःला सादर करण्यासाठी स्वतःची एखादी शैली बनवतो तेव्हा त्यानं खूप विचार केलेला असतो.
सर्वसाधारण देखणेपण असण्यानं आजूबाजूच्या समाजाच्या अस्वस्थतेला (Nana Patekar) साद घातली जाणार नाही, याची त्याला खात्री होती. समाजात अस्वस्थता आहे याची त्याला जाण होती. त्याच्याही मनात समाजात घडणार्या अनिष्ट बाबींविषयी, अन्यायाविषयी तेवढाच संताप होता. त्यामुळेच तो सामान्यांचा चेहरा बनला. अभिनयामध्ये दोन प्रकार आहेत. बुद्धीनिष्ठ अभिनय आणि शरीरमाध्यमाचा अभिनय.
नानाचा अभिनय या दोन्हींचं अफलातून मिश्रण होतं. स्वतःमधील अस्वस्थता त्याला ज्ञात होती. त्याचबरोबर स्वतःला कसं सादर करायला हवं, पडद्यावर कशा पद्धतीनं ते समर्पकपणानं पोहोचेल याचीही त्याला उत्तम जाण होती. त्यामुळेच त्याचा अभिनय बहारदार होऊन जात असे. अंकुश, प्रतिघात अशा चित्रपटांमधून याची प्रचिती आली. तीच त्याची शैली होती.
माझ्या मते, ढोबळमानानं ज्याला नायक म्हटलं जातं किंवा जी आपली समजूत आहे ती नानासारख्या अभिनेत्यांनी बदलली. त्याच्या संवादफेकीवर जीव टाकणार्यांची संख्या असंख्य आहे. किंबहुना, त्यासाठीच पुन्हा पुन्हा त्याचे चित्रपट पाहिले जातात. धारदार संवादफेकीमुळे आणि काहीशा राकट व्यक्तिमत्त्वामुळे नानाविषयी काही गैरसमज आहेत. पण नाना अत्यंत संवेदनशील मनाचा होता.
नवख्या व्यक्तीला नानांसमवेत काम करताना दडपण यायचं; पण नाना जितका तापट तितकाच प्रेमळ. चूक झाली तर तो ओरडायचा, पाणउताराही करायचा; पण थोड्या वेळानं जेवताना तो स्वतःच्या हातानं भरवायचाही! त्याच्या मनात काहीच राहात नसे. नाना त्याच्या पद्धतीनं जगत गेला. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखाद्या विशिष्ट स्थानी किंवा उंचीवर पोहोचलेल्या माणसांबरोबर काम करणं हे अवघडच असतं; कारण एका मुशीतून ती माणसं तयार झालेली असतात. त्यांची जगण्याची, वागण्याची एक रीत असते. त्यांच्या रीतीशी ज्यांचं जमतं त्यांचं जुळून जातं.
तसंच नानाचं होतं. तो खूप वेगळा होता असं नाही; पण तो ज्या स्थानी पोहोचला तिथं त्या स्थानाचे नियम आहेत. तरीही तो नव्या गोष्टी पाहायचा, नव्या लोकांची कामं पाहायचा, माहिती घ्यायचा, आवडलं तर कौतुक करायचा, गरज वाटेल तिथं सूचना करायचा. त्याबाबत तो अत्यंत मनमोकळा आणि निरपेक्षही होता.
‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून नाना, मकरंद आणि त्यांचे सहकारी करत असलेलं काम हे खरंच खूप मोठं आहे.
याबाबतचा नानाचा पुढाकार अनुकरणीय आहे. विशेषतः याच्या प्रसिद्धीची तसूभरही इच्छा न बाळगता शेतकर्यांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी झटण्याची ऊर्मी असणं आणि केवळ उपदेशांचे डोस न देता स्वतः त्याची सुरुवात करणं, आर्थिक सहभाग घेणं यातून त्याच्यातील जिवंत माणूस दिसून आला. ‘नाम’साठी शेवटपर्यंत नाना (Nana Patekar) गावागावांत जात होता.
लोकांना एकत्र आणायचा. कार्यकर्त्यांची मोट बांधायचा. अव्याहतपणानं हे काम सुरू होतं. त्याच्यातील अभिनेत्या इतकाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक हा संवेदनशील माणूस मला अधिक आवडायचा. राजकारणातील संज्ञांचा आधार घ्यायचा तर नाना लोकअभिनेता आणि लोकनेता दोन्ही दृष्टीने श्रेष्ठ होता.






