Manchar : अवसरीच्या वाघदरा पाझर तलावाला नाना पाटेकर यांचे नाव
Manchar : नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्याची व अवसरी बुद्रुक गावासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची कृतज्ञतापूर्वक दखल घेत ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने वाघदरा पाझर तलावाचे ‘नाना पाटेकर वाघदरा पाझर तलाव’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंचर : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) : नाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते स्व. नाना पाटेकर यांच्या माध्यमातून अवसरी बुद्रुक ग्रामपंचायत परिसरात सुमारे दीड कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात आली. यामध्ये ओढ्यांचे खोलीकरण तसेच पाझर तलावांचे खोलीकरण आदी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे वाघदरा तलावाला नाना पाटेकर वाघदरा पाझर तलाव, असे नाव देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी घेतला आहे. नाम फाउंडेशनच्या वतीने झालेल्या कामामुळे परिसरातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होऊन ग्रामस्थांना मोठा फायदा झाला.
नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्याची व अवसरी बुद्रुक गावासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची कृतज्ञतापूर्वक दखल घेत ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने वाघदरा पाझर तलावाचे ‘नाना पाटेकर वाघदरा पाझर तलाव’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवसरी बुद्रुक गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल पांडुरंग हिंगे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, सदस्य कल्याण हिंगे, नामदेव चव्हाण, विकास हिंगे, गुलाब चव्हाण, मच्छिंद्र टावरे, अजित वाडेकर, महेश फल्ले, दिलीप तनपुरे, नितीन शिंदे, दादाभाऊ तावरे, ऋषी हिंगे, शंकरराव अवसरीकर,भगीरथ जाधव, किसन हिंगे तसेच अवसरी बुद्रुकच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.





