अखेर ठरलं….! काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंच्या पक्ष प्रवेशाची तारीख अन् वेळ ठरली?

पुणे : पुण्यातील भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून भाजपात पक्ष प्रवेशाची तारीख आणि वेळ ठरली आहे. संग्राम थोपटे यांनी आज (20 एप्रिल) अनंतराव थोपटे महाविद्यालय फार्मसी हॉल येथे मेळाव्याचे आयोजन केलं होता. या मेळाव्यात त्यांनी मंगळवारी (दि. 22) मुंबई येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.
यामुळे भोरमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे? राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून, भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
संग्राम थोपटे हे भोरमधील काँग्रेसचे माजी आमदार असून तीन वेळेस ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. थोपटे हे तीनवेळा आमदार झाले. मात्र काँग्रेसची सत्ता असतानाही पक्षश्रेष्ठींनी त्यांना मंत्रिपदावरून डावलले. विधानसभा निवडणुकीतील पराभव संग्राम थोपटे यांच्या जिव्हारी लागला आहे.
कोण आहेत संग्राम थोपटे ?
संग्राम थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे पुत्र असून, भोर तालुक्यात त्यांचा ठसा आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
संग्राम थोपटेंचा राजकीय प्रवास?
सोनिया गांधींचे निकटवर्तीय अनंतराव थोपटेंचे संग्राम थोपटे पूत्र
संग्राम थोपटेंना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला
2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले
2009 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदा संग्राम थोपटे आमदार झाले
त्यानंतर 2014 आणि 2019च्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम थोपटेंनी हॅटट्रिक केली
विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केलेल्या संग्राम थोपटेंना 2024मध्ये पराभव स्वीकाराव लागला.





