Actress Dies : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोही यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झालं आहे. अवघ्या ३० व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्याने चाहत्यांमध्ये आणि मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. (Actress Dies) मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा त्या घरी रील शूट करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या जागीच कोसळल्या. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दिव्यांका यांच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हरियाणवी संगीत आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. अद्याप त्यांच्या कुटुंबीयांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. (Actress Dies) मूळच्या बुलंदशहर येथील असलेल्या दिव्यांका सध्या गाझियाबाद येथे कुटुंबासह राहत होत्या. त्यांनी चौधरी चरण सिंग विद्यापीठ येथून बीसीए आणि सिक्कीममधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. (Actress Dies) आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी हरियाणवी मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी मासूम शर्मा यांच्यासोबतही काम केलं होतं. सोशल मीडियावरही त्या प्रचंड लोकप्रिय होत्या. इंस्टाग्रामवर त्यांचे १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. टिकटॉकच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.