Haryana Election : हरियाणासाठी रणशिंग फुंकले ! काँग्रेस आणि भाजपच्या स्टार प्रचारकांची फौज सज्ज; पाहा संपूर्ण यादी…

Haryana Assembly Election : हरियाणात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीही उत्साहात आहे, जे की हरियाणाच्या निवडणूक लढाईत स्वबळावर उतरत आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.
दरम्यान, अश्यातच भाजप आणि काँग्रेसने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह अनेक आश्चर्यकारक नावांचा समावेश आहे. त्याचवेळी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काही नावंही आश्चर्यकारक आहेत.
हे आहे काँग्रेसचे स्टार प्रचारक :
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि भूपेंद्र सिंग हुडा यांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि कुमारी सेलजा यांनाही स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे.
कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचीही नावे पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. याशिवाय काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, पक्षाचे हरियाणा प्रभारी दीपक बाबरिया,
पक्षाचे राज्य युनिट प्रमुख उदय भान आणि ज्येष्ठ नेते अजय माकन, बीरेंद्र सिंग, आनंद शर्मा आणि सचिन पायलट यांचा समावेश आहे. अशोक गेहलोत, भूपेश बघेल, चरणजीत सिंह चन्नी आणि इतर अनेक नेत्यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह ४० नावांचा समावेश :
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांपैकी आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एम.एल. खट्टर, अर्जुन राम मेघवाल, शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, रवनीत सिंग बिट्टू, राव इंद्रजीत सिंग आणि कृष्णा पाल गुर्जर यांच्या नावांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
भाजपच्या इतर स्टार प्रचारकांमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांचा समावेश आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये पियुष गोयल, हरदीप सिंग पुरी, सुधा यादव, वसुंधरा राजे सिंधिया, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, दिया कुमारी, हेमा मालिनी, किरण चौधरी, नवीन जिंदाल, कुलदीप बिश्नोई आणि बबिता फोगट यांचाही समावेश आहे.
हरियाणाच्या विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी भाजपने सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयाकडे डोळे लावले असले तरी त्यांना काँग्रेसचे कडवे आव्हान आहे.





