Harshvardhan Patil : तारीख अन् मुहूर्त ठरला ! ‘या’ दिवशी सकाळी हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटात होणार प्रवेश

Harshvardhan Patil । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा कार्यकर्ता मेळाव्यात केली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी नुकतेच इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जावंच लागेल असंही पाटील म्हणाले.
हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, ’जनतेच्या मनात एकच आहे की मी निवडणूक लढवली पाहिजे. मी नुकताच शरद पवार यांची भेट घेतली यावेळी त्यांनीही मला सांगितले की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे.
शरद पवारांनी मला विचारलं तुम्ही काय निर्णय घेणार? तुम्ही भाजपात आहात. त्यावर शरद पवार म्हणाले की जनतेचा आग्रह आहे तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टीची काळजी मी घेईन. हा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद घेईन. त्यानंतर निर्णय जाहीर करेन. असेही पाटील यांनी सांगितले.
त्यानंतर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीख आणि मुहूर्त जाहीर केला आहे. जयंत पाटील यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी स. १० वाजता हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
जयंत पाटील यांची पोस्ट :
राज्याचे माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी स. १०…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 4, 2024
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी स. १० वा. त्यांचा पक्ष प्रवेश होईल.





