Harshit Rana Injured : टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ हुकमी एक्का दुखापतीमुळे पडला बाहेर
Harshit Rana Injured : टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे या टी-२० विश्वचषकाच्या महाकुंभातून बाहेर पडला आहे.

Harshit Rana Injured Big blow for Team India : टी-२० वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे या महाकुंभातून बाहेर पडला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान हर्षितला ही दुखापत झाली होती. कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत हर्षितच्या दुखापतीची पुष्टी केली असून, तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे सांगितले आहे.
सराव सामन्यात नेमकं काय घडलं?
‘इंडिया टुडे’च्या अहवालानुसार, नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वॉर्म-अप मॅचमध्ये गोलंदाजी करताना हर्षितला उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. केवळ दोन वेळा रन-अप घेतल्यानंतर त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि तो गुडघा पकडून मैदानातून बाहेर गेला. मेडिकल स्कॅनिंगमध्ये त्याच्या उजव्या गुडघ्यात ‘लेटरल मेनिस्कस टियर’ (Lateral Meniscus Tear) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांनी त्याला तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे तो आता आगामी काही महिने मैदानात दिसणार नाही.
Harshit Rana ruled out of T20 World Cup 2026: Sources
Read @ANI story | https://t.co/lmeLAS809k#HarshitRana #T20WorldCup2026 #IndianTeam pic.twitter.com/syoblxZdZg
— ANI Digital (@ani_digital) February 6, 2026
सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
युएसए (USA) विरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी बोलताना कर्णधार सूर्या म्हणाला, “हर्षितची प्रकृती सध्या ठीक नाही. आमचे फिजिओ त्याचे सतत निरीक्षण करत आहेत, पण दुखापत पाहता त्याचे खेळणे कठीण वाटतेय. आम्ही त्याच्या जागी योग्य पर्यायाचा शोध घेत आहोत. आम्हाला असा गोलंदाज हवा आहे जो चांगल्या गोलंदाजीसोबतच खालच्या फळीत येऊन काही मोठे फटकेही मारू शकेल. मात्र, ८-९ व्या क्रमांकावर फलंदाजी करणे हा एकमेव निकष नसेल, कारण आमच्याकडे वरच्या फळीत दर्जेदार फलंदाज आहेत.”
सिराज किंवा प्रसिद्ध कृष्णाला संधी?
हर्षित राणा 2026 च्या टी-20 विश्वचषकातून बाहेर
हर्षित राणाच्या जागी भारतीय संघात कोणाची वर्णी लागणार, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. यात दोन नावे आघाडीवर आहेत. यामध्ये पहिले नाव अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे आहे. तो भारतीय गोलंदाजीचा प्रमुख कणा राहिला आहे. त्याने १६ टी-२० सामन्यात १४ विकेट्स घेतले आहेत. अनुभवाच्या जोरावर त्याला प्राधान्य मिळू शकते.
दुसरे नाव वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाचे आहे. त्याची उंची आणि वेग यामुळे तो देखील या शर्यतीत आहे. हर्षित राणा (Harshit Rana) गेल्या काही काळापासून टी-२० संघात सातत्यपूर्ण कामगिरी करत होता, त्यामुळे त्याच्या बाहेर पडण्याने भारतीय वेगवान माऱ्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.





